नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांच्या हस्ते २०२४ या राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सलग दुसऱ्या वर्षी सन्मान करण्यात आला. यावेळेस महिला बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री पंकज भोयर आमदार संजय खेडकर मनीषा कायंदे उपस्थित होत्या. ३ मार्च रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्यात बालकांचा सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, कुपोषण,आरोग्य या विषयावर काम करणाऱ्या यंत्रणा व यंत्रणेतील अधिकारी यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल बाल हक्क संरक्षण आयोग , महिला व बाल विकास विभागाच्या वतीने बालस्नेही पुरस्कार हा देण्यात येतो. नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने महिला व बाल विकास विभागासह शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.
जिल्ह्यात मिशन आत्मनिर्भर उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील १५ गट संसाधन केंद्रांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्ययन कौशल्यात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत, सुपर ५० उपक्रमांतर्गत २२ विद्यार्थ्यांनी JEE Mains परीक्षा उत्तीर्ण झाले असून यातील ७ विद्यार्थ्यांनी JEE Advance परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. स्पेलिंग बी स्पर्धेच्या माध्यमातून नाशिक जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. जिल्ह्यात ६५० मॉडेल स्कूल साकारण्यात येत असून यामध्यमातून शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक विकास साधला जातोय. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने RBSTS App ची निर्मिती करण्यात आली असून या app च्या माध्यमातून ० ते १८ वयोगटातील बालकांच्या आरोग्य तपासणी करण्यात येऊन याबाबत ऑनलाइन सनियंत्रण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत किलबिल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले किलबिल मेळावा मध्ये कुपोषित बालक व पालकांची आरोग्य तपासणी जॉब कार्ड वाटप गोल्डन कार्ड वाटप कोंबडी वाटप प्रथिनयुक्त आहार वाटप विविध विभागातील विविध यांचे माध्यमातून कुपोषण निर्मलनामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले आहे बाल स्नेही अंगणवाडी केंद्र बनवण्यात येत आहे बालकांना अंगणवाडी केंद्रात पायाभूत सुविधा मिळावी यासाठी अंगणवाडी सुशोभीकरण रंगोटीकरण विद्युतीकरण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली स्मार्ट अंगणवाडी तयार करणे ग्राम स्तरावर ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली नाशिक जिल्हा परिषदेमार्फत बालकांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सलग दुसऱ्या वर्षी बालस्नेही पुरस्कार देण्यात आला.
हा पुरस्कार मिळाल्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांच्यासह नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांनी दिली.