पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्रामविकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आज (दि. २६ ऑगस्ट २०२५) नाशिक जिल्हा परिषदेचा राज्यातील पंचायत विकास निर्देशांक (Panchayat Advancement Index – PAI) अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल गौरव सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा गौरव करण्यात आला यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) डॉ. वर्षा फडोळ उपस्थित होते.
सन २०२२-२३ च्या मूल्यांकनानुसार जाहीर झालेल्या निकालांत नाशिक जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे. तसेच नाशिक पंचायत समितीने राज्यात पहिला क्रमांक, चांदवड पंचायत समितीने नववा क्रमांक मिळवला. ग्रामपंचायतींच्या स्तरावर नाशिक तालुक्यातील दरी ग्रामपंचायतीला राज्यात पाचवा क्रमांक व इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला सहावा क्रमांक मिळाल्याने गौरव करण्यात आला, नाशिक जिल्ह्याने सर्व स्तरांवर उल्लेखनीय यश संपादन केले. या स्थानिक स्वराज्य संस्थांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला.
सातत्याने प्रयत्नशील राहू.
सन २०२२-२३ मूल्यांकनानुसार जिल्हा परिषदेस पंचायत विकास निर्देशांकात ना. मंत्री महोदय यांच्या हस्ते (PAI) मिळालेला राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हा संपूर्ण जिल्ह्याचा सन्मान आहे, शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढील काळात देखील सातत्याने प्रयत्नशील राहू.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक