इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महिलांनी विशाखा समितीकडे तक्रारी केल्यानंतर या प्रकाराची समितीने चौकशी सुरु केली आहेत.
हा अधिकारी कामचा धाक दाखवत व काही अमिष दाखवत या महिला कर्मचा-यांचा मानसिक व लैगिंक छळ करत होत होता. त्यानंतर काही महिलांनी पुराव्यानिशी तक्रार केल्यानंतर खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीच्या चौकशीत आता काय येतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकणात संबधित अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये बराच काळापासून कार्यरत असून पदाचा गैरवापर करुन महिलांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. सुरुवातील ब-याच महिला भीतीपोटी मौन बाळगत होत्या, मात्र एका पीडितेने तक्रार दाखल केली. त्यानंतर इतर महिलांनीही पुढे येत आपबिती सांगितली.
दरम्यान याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की, काही महिलांकडून पुराव्यानिशी लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत विशाखा समितीला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात तथ्य आढळल्यास संबधित दोषींवर कारवाई केली जाईल.