बुधवार, मे 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा परिषदेला यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानांतर्गत विभागीय प्रथम पुरस्कार…ही पंचायत समिती विभागात तिसरी

by India Darpan
मे 27, 2025 | 6:41 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250527 WA0325 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यस्तरीय “यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२३-२४” अंतर्गत विभागस्तरावरील अत्युकृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषद नाशिकला विभागीय प्रथम क्रमांकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मा. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कळवण पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियान सन 2023 24 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक महसुली विभागात तृतीय क्रमांक मिळवला यावेळी मा. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते तत्कालीन गट विकास अधिकारी निलेश पाटील, गटvविकास अधिकारी रमेश वाघ व सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनवणे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा परिषदेला सभा कामकाज, कर्मचारी व्यवस्थापन, तक्रार निवारण, सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, भरती प्रक्रिया, माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा, अतितीव्र (SAM) व तीव्र (MAM) कुपोषित बालकांचे श्रेणीवर्धन, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, बालकांचे लसीकरण तसेच भौतिक विकासाची कामे या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

या अभियानांतर्गत ग्रामीण प्रशासनात पारदर्शकता, गतीशीलता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात आला. जिल्हा परिषद नाशिकने या सर्व निकषांवर प्रभावी अंमलबजावणी करत विभागीय स्तरावर आघाडी घेतली. प्रशासनातील डिजिटायझेशन, ई ऑफिसचा प्रभावी वापर, ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले असून या यशात सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गाचे योगदान मोलाचे असल्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले, भविष्यातही नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रत्येक पातळीवर उत्कृष्ट कार्याच्या दिशेने पुढे जाण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.

उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा देखील सन्मान :
सन 2022 – 23
सचिन पवार, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत दरी ता. नाशिक
भालचंद्र विठ्ठल तरवारे, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत बेहेड, ता. निफाड

सन 2023 – 24
डॉ.भगवान ताडगे, सहाय्यक पशुधन अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना गिरनारे, पंचायत समिती नाशिक
सुनील ठाकरे, कनिष्ठ सहायक, पंचायत समिती चांदवड

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण दहा निर्णय…वाचा सविस्तर

Next Post

सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी बाबत महावितरणने दिली ही माहिती….

Next Post
mahavitarn

सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी बाबत महावितरणने दिली ही माहिती….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रलोभने देऊ व घेऊ नये, जाणून घ्या, गुरुवार, २९ मेचे राशिभविष्य

मे 28, 2025
IMG 20250523 WA0316

छगन भुजबळ यांनी मंत्रालयात कार्यभार घेताच विभागाची घेतली बैठक…दिले हे निर्देश

मे 28, 2025
IMG 20250528 WA0307

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली सिन्नर बस स्थानकाची पाहणी…

मे 28, 2025
Apple Days Banner W Amt 1

विजय सेल्सचा अ‍ॅपल डेज सेल सुरु…ही आहे ठळक वैशिष्ट्य

मे 28, 2025
RUPALI

राज्य महिला आयोग अध्यक्षांच्या उपस्थितीत नाशिक येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’

मे 28, 2025
ajit pawar11

तुळजापूरच्या देवी मंदिर विकास आराखड्यासाठी १ हजार ८६५ कोटी मंजूर…

मे 28, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011