नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेची प्रभाग संख्या तसेच प्रारूप राज्याचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी महापालिका प्रभाग रचनेची संख्या निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर ज़िल्हा परिषदेचे काय, अशी चर्चा इच्छुकांमध्ये सुरु झाली झाली जिल्हा परिषदेच्या गटांचीही नव्याने रचना होणार का, याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील बहितांश स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ गेल्या फेब्रुवारीतच संपुष्ठात आला आहे. त्यात नाशिक महापालिका तसेच जिल्हा परिषद-पंचायत समित्यांचा समावेश आहे. सध्या या ठिकाणी प्रशासक कार्यरत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणूक लांबणीवर पडल्या असल्याचे कारण पुढे केले जात असले तरी राजकीय मुद्दाच याकामी महत्वाचा ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निवडणुकीची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. या महिन्याच्या अखेरीपर्यंत निवडणुका होतील असे सूतोवाचही करण्यात आले होते. पण राज्यात सत्तांतर झाले अन निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. एवढेच नाही तर प्रभाग रचना असो कि जिल्हा परिषदेचे वाढलेले गट असे सारेच रद्द करण्यात आले. या निर्णयामुळे इच्छुकांची हिरमोढ झाला तर राजकीय हालचालीही थंडावल्या होत्या.
आता मात्र इच्छुकांच्या अपेक्षांना पुन्हा धुमारे फुटले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्याच्या उपसचिव कुलकर्णी यांनी महापालिकेच्या प्रभागांची संख्या निश्चित करणे आणि रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याचे आदेश काढले. महापालिकेच्या बाबतीत आदेश काढले पण जिल्हा परिषद -पंचायत समित्यांचे काय, अशी कुजबुज इच्छुकांमध्ये सुरु आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या बाबतीतही स्वतंत्र आदेश काढले जाणार काय, अशी विचारणाही सुरु झाली आहे.कारण जिल्हा परिषदेची वाढीव गटांसंबंधित सारीच प्रक्रिया सरकारने यापूर्वीच रद्द केली आहे. सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
Nashik Zilha Parishad Wardwise Structure Election