नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषदेच्या गट व गण रचनेचा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हयातील जिल्हा परिषद गटांची संख्या ७४ व पंचायत समिती गणांची संख्या १४८ झाली आहे. या प्रारूप गट व गण रचनेला हरकत घेण्यासाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. गट रचनेच्या प्रारूप आराखड्यानुसार मालेगाव, सुरगाणा व चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक गट व दोन गण वाढले आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेच्या यापूर्वी झालेल्या २०१७ मधील पंचवार्षिक निवडणुकीत ७३ गट व १४६ गण होते. दरम्यान मधल्या काळात निफाड तालुक्यातील ओझर व पिंपळगाव बसवंत येथे नगरपालिका झाल्यामुळे दोन गट कमी होऊन जिल्हा परिषद गटांची संख्या ७३ वरून ७१ झाली होती. मात्र, गट रचनेच्या सूत्रानुसार नव्या गट रचनेत नाशिक जिल्हा परिषद गटांची संख्या ७४ झाली आहे. या सर्व ७४ गटांचा प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने जाहीर केला आहे. त्यानुसार मालेगाव तालुक्यात खाकुर्डी गट वाढला असून वडणेर गटाऐवजी साकुरी हा नवीन गट तयार झाला आहे. सुरगाणा तालुक्यात पूर्वीच्या गोंदुने, हट्टी, भवाडा या तीन गटांची पुनर्रचना होऊन उंबरठाण, त्रिभुवन, ठाणगाव, हतगड हे चार नवीन गट तयार झाले आहेत. चांदवड या तालुक्यांमध्ये पूर्वीचे चार गट तसेच असून पुनर्रचनेत धोडंबे हा नवीन पाचवा गट अस्तित्वात आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा परिषदेच्या गट व गण रचनेचा प्रारूप आदेश जाहीर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या ७४ गट आणि १४८ गणांच्या प्रारूप रचनेतील हरकतीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एकूण ७४ गट आणि १४८ गणांच्या विभाग रचनेतील हरकतीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे २१ जुलै पर्यंत किंवा तत्पूर्वी सादर कराव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर प्राप्त होणार्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी वेळेत प्रतिक्रिया नोंदवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असे आहे वेळापत्रक
-प्रारूप गट गण रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे (१४ जुलै)
-प्रारूप गट गण रचनेला हरकती घेणे २१ जुलै
-विभागिय आयुक्तांकडे हरकतींवर सुनावणी ११ ऑगस्ट
-अंतिम गण गट रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे १८ ऑगस्टपर्यत
जिल्ह्यातील ७४ गट तालुकानिहाय पुढीलप्रमाणे
बागलाण : मानूर, ताहाराबाद, जायखेडा, नामपूर, विरगाव, ठेंगोडा, ब्राह्मणगाव.
मालेगाव : खाकुर्डी, झोडगे, कळवाडी, साकुरी नि., दाभाडी, रावळगाव, सौदाणे, निमगाव
देवळा : लोहणेर, उमराणे, खर्डे (वाखारी)
कळवण: पुनदनगर, मानूर, कनाशी, अभोणा.
सुरगाणा : उंबरठाण, त्रिभुवन, ठाणगाव, हतगड
पेठ : आंबे, कोहोर
दिंडोरी : अहिवंतवाडी, कसबेवणी, खेडगाव, कोचरगाव, उमराळे, मोहाडी.
चांदवड : धोडंबे, दुगाव, वडनेरभैरव, वडाळीभोई, तळेगाव रोही.
नांदगाव : साकोरा, न्यायडोंगरी, भालूर, जातेगाव
येवला : पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल, मुखेड
निफाड : पालखेड, लासलगाव, विंचुर, उगांव, कसबेसुकेणे, चांदोरी, सायखेडा, नांदुरमध्यमेश्वर
नाशिक : गिरणारे, पळसे, एकलहरे, विल्होळी
त्र्यंबकेश्वर : ठाणापाडा, हरसूल, अंजनेरी
इगतपुरी : खंबाळे, वाडीवर्हे, घोटी बु, नांदगाव सदो, धामणगाव,
सिन्नर : माळेगाव, मुसळगाव, सोमठाणे, नांदुरशिंगोटे, दापूर, ठाणगाव
shaymugale74@gmail.com