नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेमधील सामान्य प्रशासन विभागांतर्गंत कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरुन सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी २, वरिष्ठ सहाय्यक या पदावरुन कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदी ३ व कनिष्ठ सहाय्यक या पदावरुन वरिष्ठ सहाय्यक पदी ८ अशा १३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी मंगळवार २७ ऑगस्ट रोजी समुपदेशन करुन त्यांच्या विनंतीनुसार त्यांची पदस्थापना केली व पदस्थापना आदेश २७ ऑगस्ट रोजीच निर्गमित करण्यात आले, असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक ८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती व त्यामधील अधिकारी व कर्मचारी यांना ७ मार्च रोजी पदोन्नती देण्यात आली होती आणि कामी कर्मचारी प्रतिक्षासूचीत होते. त्या प्रतिक्षासूचीतील कर्मचाऱ्यांना २७ ऑगस्ट रोजी पदोन्नती देऊन आदेश देण्यात आले आहेत.
याकरिता सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुनिल थैल, भास्कर कुवर, कानिफ फडोळ, सहायक प्रशासन अधिकारी अनिल गिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र येवला, कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड, सामान्य प्रशासन विभागातील लघुलेखक साईनाथ ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयातील गौतम अग्निहोत्री, रत्नाकर आहिरे व सामान्य प्रशासन विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनी याबाबत कामकाज केले आहे.
( पदोन्नत अधिकारी यांचे नाव, पदोन्नतीने दिलेले कार्यालय खालीलप्रमाणे )
- श्री. हिरालाल पाकळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, चांदवड
- श्री. निवृत्ती बगड, सहाय्यक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर
- श्रीमती सिमा वानखेडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग, जि. प. नाशिक
- श्रीमती कमल इंपाळ, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, देवळा
- श्री. अर्जुन निकम, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग (प्राथमिक), जि. प. नाशिक
- श्रीमती सुनिता दळवी, वरिष्ठ सहाय्यक, कृषि विभाग, जि. प. नाशिक
- श्रीमती वैशाली गायकवाड, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, नाशिक
- श्रीमती जयश्री ठाकरे, वरिष्ठ सहाय्यक, इ. व द. विभाग क्र. 3, जि. प. नाशिक
- श्रीमती लता भोये, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, कळवण
- श्रीमती प्रिती नाडे, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, इगतपुरी
- श्रीमती भारती बोंबले, वरिष्ठ सहाय्यक, इ व द विभाग क्र. 2, जि. प. नाशिक
- श्रीमती सुनिता जगताप, वरिष्ठ सहाय्यक, शिक्षण विभाग (प्राथमिक), जि. प. नाशिक
- श्रीमती वैशाली बच्छाव, वरिष्ठ सहाय्यक, इ. व द. उप विभाग, मालेगांव
पदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन, ग्रामीण भागात सेवा देताना प्रशासकीय कामात गतिमानता आणता येईल याकडे अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे”
डॉ. अर्जुन गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक