नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबविण्यात आली. राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याचा निषेध म्हणून ही मोहीम राबविण्यात आली.
नाशिकच्या कॉलेज रोडवरील भोसला सर्कल येथे युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. तसेच देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यावर जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिकमधून पाच हजार पोस्टकार्ड पाठवले जाणार आहे.
विरोधी पक्ष संपवण्याची सुडबुद्धी या देशात सुरू असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी केला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
⭕ *नाशकात ही कंपनी करणार १६० कोटींची गुंतवणूक*
मोठा रोजगारही निर्माण होणार
https://t.co/yf9GSw25Vh#Good #News #nashik #indiadarpanlive #expansion #multinational #company #investment #samsonite #industry #development— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 5, 2023