नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील भिंगार नदीच्या कडेला शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १४ वर्षाच्या कार्तिक वारे या तरुणाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. काल तो शेळ्या चारण्यासाठी गेला होता. पण तो घरी न आल्यामुळे आई वडील व वाडीतील सर्व लोक रात्री पासून त्याचा शोध नदी पात्रात घेत होते. पण, तो मिळाला नाही.
त्यानंतर आज मात्र दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळून आला. तो शेळीला वाचविण्यासाठी गेला असता शेळी वाचली मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला. हा मुलगा त्रंबकेश्वर तालुक्यातील देवगाव पैकी पाराचा आंबा येथील होता. नाशिक आणि पालघर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती बकऱ्या चालण्यासाठी गेला असताना ही घटना घडली.