अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील पिंपळखुटे तिसरे येथील प्रसिद्ध असलेल्या म्हसोबा मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याची धक्कादायक घटना आज उघडीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी दानपेटी चोरण्यापूर्वी गावातील विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच, मंदिरातील सीसीटीव्हीचे डिव्हीआर चोरले. त्यानंतर चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी उचलून ती दूरवर नेली. दानपेटी फोडत त्यातील १ लाख ५ हजार रुपये घेऊन चोरटे फरार झाले. याची माहिती मिळताच येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भावारी यांच्यासह पथक गावात आले. त्यांनी परिसराची पाहणी केली आहे. विविध पुरावे हस्तगत केले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
बघा व्हिडिओ
Nashik Yeola Village Mhasoba Temple Donation Box Theft Police Pimpalkhute Tisre