येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढी एकादशीचे औचित्य साधत येवल्यातील संतोष राऊळ या कलाकाराने वारक-याच्या काठीवर विठ्ठलाच्या विविध प्रतिकृती साकारल्या आहे. या काठीवर दिंडी सोहळा, पालखी सोहळा, वारक-यांच रिंगण, वारकरी नाचतांना, अश्व रिंगण सोहळा असे वारीतील विविध प्रकारचे चित्र ध्वज काठीवर पेंटींग करत साकारले आहे.
तर दुसरीकडे मालेगाव मधील साई आर्टच्या रांगोळी कलाकारांनी बारा बाय अठरा आकाराची सलग ८० तास राबत सुंदर अशी पंढरीच्या वारीची रांगोळी साकारली. आपल्या कलेतून साकारलेल्या या रांगोळीत लेक पिगमेंटचे रासायनिक रांगोळीचे रंग एकत्रित करण्यात आले आहे. या रांगोळीसाठी सुमारे ३५ किलो रांगोळी लागली. साई आर्टचे प्रमोद आर्वी हे नेहमी अशा विविध प्रकारच्या रांगोळी आपल्या कलाकारांमार्फत साकारत असतात. त्यामुळे या दोन्ही कलाकारांनी साकरलेले पालखी सोहळ्यातील क्षण निश्चितच वेगळे आहे.