येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून कांद्याला बाजार भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने प्रहार शेतकरी संघटना येवल्यात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. थेट प्रांत कार्यालयावर धडक देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने येवला प्रांत कार्यालय आवारात कांद्याच्या माळा गळ्यात घालत मुंडन आंदोलन करण्यात आले.
यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला दोन हजार रुपये हमीभाव, निर्यात होणाऱ्या कांद्याला अनुदान, खताच्या किमती कमी करण्याची मागणी यासह विविध मागण्या करण्यात आल्या,सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावाचे आणि सरकारचा यावेळी निषेध करत हे मुंडन आंदोलन करण्यात आले.
Nashik Yeola Onion Farmer Agitation