नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसापासून येवला शहर परिसरामध्ये एक वानर दाखल झाले आहे. हे वानर विविध भागात जाऊन मर्कट लीला करत असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा असते. त्यातच आता या वानराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हे वानर चक्क एका कारच्या टपावर बसले. आणि शहरातील गणपती मंदिरापासून या कारवरुनच मेनरोड मार्गे टिळक मैदान येथील हनुमान मंदिरापर्यंत आले. त्यानंतर या माकडाने काळा मारुती रोड वरून गंगादरवाजा पर्यंत दुसऱ्या गाडीच्या टपावर बसत प्रवास केला. हा सर्व प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला.. या वानरास फळ देखील खाऊ घातले. वानराच्या कारवरील प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच, या व्हिडिओची चर्चाही होत आहे.