येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवल्यात महामार्गावर दोघा चोरट्यांनी इनोव्हा गाडीचे सेंटरलॉक तोडत गाडी चोरुन नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. साई माऊली पैठणीचे मालक प्रकाश शिंदे यांनी आपली इनोव्हा दुकाना जवळ लावलेली होती. दुस-या कार मधून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्याच्या गाडीचे सेंटरलॉक तोडत गाडी ही कार चोरुन नेली.
या कार चोरीप्रकरणी तालुका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरीचा पोलिस अधिक तपास करीत आहे. तालुक्यातील ग्रामिण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतांना बुधवारी जळगाव नेऊर येथे बँकेला भगदाड पाडून चोरीचा प्रयत्न असफल झालेला असतांनाच या चोरीचा प्रकार समोर आला आहे.