येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील हरिण संवर्धन क्षेत्रा लगत असलेल्या बाईबोथी जवळ बागडणा-या हरणांच्या कळापाच्या मागे भटके कुत्रे लागल्याने जीव वाचविण्याच्या नादात दोन हरण विहिरीत पडली. ही गोष्ट शेतक-याच्या लक्षात येताच वन्यजीव संरक्षक पथकाने धाव घेत हरणांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने एका हरणाचा मृत्यू झाला तर एका हरणाला जीवदान देण्यात यश आले.
जिवंत हरणाला वनविभागाच्या ताब्यात सुर्पुद करण्यात आले. येवला तालुक्यातील राजापूर, कोळगाव, ममदापूर, नगरसूल, भारम, कोळम या भागात जेथे हरिण, काळविटांचे अस्तित्व आहे. त्यामुळे येथे कधी पाण्यासाठी हरणांना वणवण भटकावे लागते. तर कधी त्यांची शिकार होते. पण, त्याचे प्रमाण आता कमी झालेले असतांना आता कुत्र्यांपासून हरणाला संरक्षण करणे गरजेचे आहे.