येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंगणगावातील पोलिस वसाहतीतमहिला पोलिसाच्या घरी घरफोडी करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करणा-या अट्टल चोरट्यास संभाजीनगर येथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरुन नेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या चोरट्याने आणखी कुठे कुठे चोऱ्या केल्या याचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
२३ मे रोजी अंगणगांव पोलीस वसाहत बिल्डींग नं. २, रूम नं. ६ मध्ये अज्ञात आरोपीने दरवाजाचा कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉकर तोडून साडेचार तोळे सोने व २६ भार चांदी असा एकूण ६१ हजार ५०० रुपयाचा या मुददेमाल चोरून नेला होता. सदर गुन्हयाचे तपासात घटनास्थळावरून आरोपीच्या हाताचे ठसे (चान्सप्रिंट) प्राप्त झाल्या होत्या. त्या चान्सप्रिंटचे अॅम्बीस प्रणाली द्वारे तांत्रीक विश्लेषण केल्यानंतर सदरचे चान्सप्रिंट हे आरोपी प्रज्वल गणेश वानखेडे (वय २६, रा श्रीकृष्ण नगर, हुडको, छत्रपती संभाजीनगर) याचे असल्याचे निष्पण्ण झाले होते. आरोपी यास छत्रपती संभाजीनगर येथून त्याचे रहाते घरातून ताब्यात घेउन त्याचेकडून गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी साडेचार तोळे सोने व १६० मिलीग्रॅम चांदी हस्तगत केली.
या आरोपीस न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना १५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांचे सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोहवा दिपक शिरूड, पोना संदीप पगार, गणेश पवार, बाबा पवार, सतिश बागुल, मोबाईल सेलचे पोशी जिलबीले. अंगुलीमुद्रा तज्ञ सपोनी किशोर जोशी यांनी केला आहे.