नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासकीय योजने अंतर्गत वडीलांचे सातबारा उताऱ्यावर नांव लावण्यासाठी ९ हजार रुपयाची लाच प्रकरणात येवल्यातील मंडळ अधिकारी पांडुरंग हांडू कोळी व खासगी इसम विठोबा जयराम शिरसाठ हे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणात १५ हजाराची लाच मागण्यात आली होती. पण, तडजोडी अंती ९ हजार रुपये लाच मंडळ अधिका-याच्या सांगण्यावरुन खासगी व्यक्तीने स्विकारली.
या कारवाईबाबत एसीबीने दिेलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे आईचे नांव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांचे सातबारा उताऱ्यावर नांव लावण्यासाठी लोकसेवक पांडुरंग कोळी यांनी १५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ९ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम त्यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ यांनी स्वीकारली असता त्यांना पंच साक्षीदारांचा समक्ष ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
यशस्वी सापळा कारवाई
लाचखोरांचे नाव-
*१) पांडुरंग हांडू कोळी, मंडळ अधिकारी, वर्ग – ३, वय – ५७ वर्षे मौजे सावरगांव, ता.येवला जिल्हा नाशिक.
२) आरोपी खाजगी इसम विठोबा जयराम शिरसाठ वय – ३२ वर्ष , व्यवसाय शेतमजुरी राहणार मुक्काम पोस्ट ठाणगांव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.
सापळा अधिकारी
मीरा आदमाने पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. नाशिक. मोबा.नं.9921252549
*सापळा पथक*
पो.ना, प्रवीण महाजन
पो.ना किरण अहिरराव
पो.ना. प्रमोद चव्हाणके
चालक पो.ना. परशराम जाधव
मार्गदर्शक-
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9371957391
2) मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049
*3) श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मो.नं. 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
*@ मोबा.क्रं. 8806643000
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
Nashik Yeola Crime ACB Trap Bribe Corruption