येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेच्या भिंतीला भले मोठे भगदाड पाडून रोकड लुटण्याच्या उद्देशाने बँकेत घुसलेल्या चोरट्यांना बँकेत कुठलीही रोकड हाती न लागल्याने रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ आली. ही घटना नाशिकच्या येवला तालुक्यातील जळगाव-नेऊर येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत घडली.
सकाळी बँक उघ़ल्यावर बँकेच्या कर्मचा-यांच्या लक्षात हा प्रकार आला. मात्र बँकेत रोकडच नसल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. तालूका पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर घटनस्थाळाचा पंचनामा करण्यात आला. हा प्रकार घ़ल्यानंतर बँकेचे कामकाज मात्र सुरळीत पणे सुरु होते. बँकेत रोकड असती तर काय झाले असते असा प्रश्न येथील गावक-यांना पडला. चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून पोलिस कसून तपास करत आहे.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
Nashik Yeola Bank Dacoity Crime Theft