नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यात एक कृषी औद्योगिक प्रकल्प लवकरच साकारला जाणार आहे. अल्कोकेमअॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीने तसे निश्चित केले आहे. येवला येथील बल्हेगाव येथे या कंपनीच्यावतीने इथेनॉल निर्मितीचे केंद्र सुरू केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवसाकाठी १० किलोलीटर इथेनॉल निर्मिती क्षमतेचा प्रकल्प कंपनी उभारणार आहे. या प्रकल्पासाठी ३१.०६ एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. याच प्रकल्पामध्ये २.४ मेगावॅट वीजेचे उत्पादनही केले जाणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या कंपनीला या प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे.
कंपनीच्यावतीने लवकरात लवकर हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच येत्या जून महिन्यापासून प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी कंपनीच्यावतीने सुरू आहे. या प्रकल्पामुळे येवला तालुक्यात मोठी गुंतवणूक होणार आहे. तसेच, रोजगाराची निर्मितीही होणार आहे.
Nashik Yeola Agro Industry Investment Employment