येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. येवला शहर पोलीस स्टेशन येथे नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस कॉन्स्टेबल हे ५० हजार रुपयाच्या लाच प्रकरणात जाळ्यात सापडले आहे. तक्रारदार याच्या भावावर दाखल गुन्ह्यात आणकी कलमे वाढवू नये यासाठी ही लाच मागितल्याचे बोलले जात आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि पोलिस शिपाई सतिश बागुल अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत. हे येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. येवला शहर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पोलीस कोठडीमध्ये मारहाण करणार नाही तसेच सदर गुन्ह्यात ३०७ वाढीव कलम लावण्याची भीती घालून लाचखोर सपकाळे आणि बागुल यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचखोर सपकाळेने गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांचा मोबाईल हिसकावला. तसेच त्यातील मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली म्हणून भ्रष्ट्राचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 ,7(a) तसेच भादंवि कलम 166 ,201 ,452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास अधिकारी
विश्वजीत जाधव, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
सापळा पथक
पो.नि.परशुराम कांबळे पो.हवा. प्रकाश डोंगरे पो.हवा. प्रणय इंगळे पो.ना.नितिन कराड चापोना.परसराम जाधव
*मार्गदर्शक
*मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
मा .श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक मो नं 9404333049
श्री नरेन्द्र पवार (वाचक) पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा
दूरध्वनी क्रमांक- 02532578230,
टोल फ्री क्रमांक – १०६४ .
Nashik Yeola ACB Trap Bribe Corruption Police API