येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील पंचायत समितीचे दोन लाचखोर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) जाळ्यात सापडले आहेत. येवला पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) गंभीर लहू सपकाळे आणि विस्तार अधिकारी (वर्ग- 3) आनंदा रामदास यादव अशी या लाचखोरांची नावे आहेत.
गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागणारे पंचायत समितीचे दोन अधिकारी लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. या प्रकणात येवला पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) गंभीर लहू सपकाळे, विस्तार अधिकारी (वर्ग- 3) आनंदा रामदास यादव यांचावर लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे.
या लाच प्रकरणाबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात गंभीर लहू सपकाळे यांनी एका फाईलचे ५०० रुपये याप्रमाणे तीन फाईलचे १५०० रुपये तसेच आनंदा रामदास यादव यांनी तीन फाईलचे ५०० रुपये या प्रमाणे १५०० रुपये मागितले. तडजोडअंती १००० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि त्यात हे दोघे अडकले. आता या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक मीरा आदमाने, सापळा पथकातील एकनाथ बाविस्कर ,चंद्रशेखर मोरे प्रविण महाजन, नितीन कराड, संतोष गांगुर्डे,परशुराम जाधव यांनी केली.
Nashik Yeola ACB Trap Bribe Corruption