नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात ३ हजाराची लाच स्विकारतांना येवला तालुका पोलिस स्टेशनचा सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिंदे हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. त्याने ४ हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. त्याचा पहिला हप्ता ३ हजार स्विकारतांना तो रंगेहात सापडला.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, एका महिलेने येवला तालुका पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर पुढे काहीही कार्यवाही करु नये म्हणून या महिलेच्या पतीने लाचखोर शिंदे अशी विनंती केली. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचखोर शिंदे याने ४ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता रुपये ३ हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना लाचखोर विजय शिंदे रंगेहात सापडला. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
यशस्वी सापळा अहवाल
लाचखोराचे नाव – श्री. विजय नारायण शिंदे वय-51 वर्ष, सहा. पो. उप निरीक्षक , वर्ग 3, नेमणूक येवला तालुका पोलीस स्टेशन,नाशिक ग्रामीण
*लाचेची मागणी-4,000/-रु. दि. 05/06/2023
*लाच स्विकारली-* 3000/- रुपये.
*हस्तगत रक्कम*- 3000/- रुपये.
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे पत्नीने येवला तालुका पोलिस स्टेशन येथे दिलेल्या एन सी वरून सामनेवाले यांचेवार कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या एन सी व तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून 4000/- रुपये लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता रुपये 3,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी-
*वैशाली पाटील , पोलीस उप अधीक्षक , ला.प्र.वि.नाशिक . 7722000949
सापळा पथक
पोना राजेश गिते, पोना शरद हेंबाडे, पोना अनिल राठोड (सर्व नेमणूक ला.प्र.वि.नाशिक)
मार्गदर्शक-
*मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो,* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक 9371957391
*श्री.नरेंद्र पवार*, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. 9822627288
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.*
*अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक
Nashik Yeola ACB API Trap Bribe Corruption