नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गुरुवारी दुपारी गोदापात्रात उडी घेत ५४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. मंजुशा रामचंद्र शिंदे (रा.मार्ट मॉलजवळ, जायभावे नगर, पाथर्डी फाटा) असे मृत महिलेचे नाव आहे. शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून रामवाडी पुल गाठून गोदापात्रात उडी घेतली होती. ही बाब निदर्शनास येताच स्थानिकांनी धाव घेत महिलेस पाण्याबाहेर काढले मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी माधुरी भामरे यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक आहेर करीत आहेत.
सिडकोत व्यावसायिकाची आत्महत्या
३३ वर्षीय व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील पवननगर भागात घडली. सचिन कैलास पाटील (३३ रा.अक्षय चौक, पवननगर) असे मृत व्यावसायिकाच नाव आहे. पाटील यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाटील यांनी गुरूवारी (दि.२९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात कुणी नसतांना छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पंडीत खैरणार यांनी खबर दिल्याने मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.