नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा करोडपती होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘आता मागे नाही राहायचं’, असं सांगत ’कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम स्पर्धकांसाठी एक नाही तर तब्बल २ करोड रुपये जिंकण्याची संधी घेऊन आला आहे. म्हणजेच ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमात आता बक्षिसाची रक्कम दुप्पट झाली आहे. प्रश्नोत्तरांच्या या मनोरंजक खेळात सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांचे दमदार निवेदन आणि दिलखुलास संवादकौशल्य प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. नाशिकच्या वर्षा पगार २२ आणि २३ जून रोजी हॉट सीटवर बसणार आहेत तेव्हा पहायला विसरु नका ‘कोण होणार करोडपती ‘सोम. ते शनि, रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.
निरनिराळ्या क्षेत्रांतले स्पर्धक ‘कोण होणार मंचावर पाहायला मिळतात. या पर्वात सहभागी होण्यासाठी तब्बल १४ लाख स्पर्धकांनी नोंदणी केली होती. पुढील नोंदणी प्रक्रियेला सामोरे जात त्यांतून काही स्पर्धक निवडले गेले. आपली स्वप्नपूर्ती व्हावी या आशेने हे प्रेक्षक या खेळाचा भाग होतात. मुळात नाशिकच्या असलेल्या आणि कोलकत्ता येथे स्थायिक असलेल्या वर्षा पगार ह्या हॉट सीटवर येणार आहे. रिजनल प्रोविडेंट फंड कंमिशनर म्हणून त्या कार्यरत आहेत.
सचिन खेडेकर यांच्यासोबत रंगलेल्या तिच्या गप्पा नक्कीच प्रेक्षकांना आवडतील. त्यांनी चक्क सचिन खेडेकरांकडून कविता म्हणून घेतल्या त्या प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. आता कोण होणार करोडपती च्या हॉट सीटवर आल्यावर वर्षा कशा प्रकारे खेळतील आणि करोडपती व्हायचे तिचे स्वप्न पूर्ण करतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
वर्षा ला नव्या पर्वात हॉट सीटवर येण्याची संधी मिळाली आहे. आता हॉट सीटवर आल्यावर वर्षा कशी आणि किती रक्कम जिंकून जाते हे पाहणे नाशिकरांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. पाहायला विसरू नका कोण होणार करोडपती गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर