नाशिक – शहराच्या काही भागात येत्या बुधवारी (२२ डिसेंबर) पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्याची दखल नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र येथून नाशिकरोड विभागातील जलकुंभ भरणारी मुख्य उर्ध्ववाहिनीला गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रालगत मोठ्या प्रमाणावर गळती सुरु झाली आहे. या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे बुधवार (दिनांक 22/12/2021) नाशिकरोड विभागातील खालील नमुद भागातील दुपार सत्र व सांयकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. दिनांक 23/12/2021 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा बाधित होणारा भाग असा
प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर
प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.
प्रभाग क्र.19- गोरेवाडी,
प्रभाग क्र.20- पुनारोड परीसर, डावखर वाडी, जयभवानी रोड परीसर, अश्विनी कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव.
प्रभाग क्र.21- जयभवानी रोड परीसर, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड, धोंगडे नगर, जगताप मळा, तरण तलाव परीसर, चव्हाण मळा, फर्नाडिस वाडी, भालेराव मळा, जाचक नगर, नंदनवन कॉलनी, आवटे नगर
प्रभाग क्र.22- रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदर नगर