नाशिक – शहरातील पाणी पुरवठ्याबाबत नाशिक महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. जलवाहिनीची गळती दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवस काही भागातील पाणी पुरवठा बाधित होणार आहे.
म्हणून पाणी पुरवठा नाही
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० मधील समृध्द नगर येथील डीपी रस्त्यालगत १२०० मी. मी. व्यासाची ग्रॅव्हेटी मेन पी. एस. सी. पाईपलाईनला गळती सुरु आहे. तसेच गंगापूर धरण, गेट जवळ १००० मी.मी. व्यासाची रायझींग मेन डी. आय. पाईपलाईनला गळती सुरु आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे.
या तारखेला पुरवठा नाही
जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी (५ ऑक्टोबर) करण्यात येणार आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (६ ऑक्टोबर) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
या भागात पाणी नाही
सातपूर विभागातील
प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 11, 26 व प्र. क्र.27 भागश: मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौक
नाशिक पश्चिम विभागातील
प्रभाग क्रमांक 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर वनविहार कॉलनी, लव्हाटे नगर, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गुरीटी चौक परिसर आदी
नविन नाशिक (सिडको) विभागातील
प्रभाग क्रमांक (भागश:परिसर) इंद्रनगरी परिसर, प्रभाग क्रमांक 28 (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर, प्रभाग क्रमांक 27 (भागश:परिसर) चुंचाळे घरकुल योजना