नाशिक – शहरातील पंचवटी विभागात येत्या शनिवारी (१४ ऑगस्ट) पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे. पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथील म्हसरुळ व बोरगड जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी केंद्राच्या आवारात लिकेज झाली आहे. या जलवाहिनीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. सदर उर्ध्ववाहीनीचे दुरुस्ती करणेचे काम येत्या शनिवारी (१४ ऑगस्ट) केले जाणार आहे.
त्यामुळे म्हसरुळ व बोरगड जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, प्रभाग क्र.१ मधील ओंकारनगर, वृंदावननगर, प्रभातनगर, दिंडोरी रोड राणा हॉटेलपर्यंत, म्हसरुळ मखमलाबाद लिंकरोडवरील पूर्ण परिसर, ओमनगर, गणेशनगर, स्नेहनगर, गुलमोहरनगर, शनिमंदिर परिसर, म्हसरुळ गावठाण, संभाजीनगर, बोरगड आश्रमशाळेजवळील परिसर, आदर्शनगर, एकतानगर, प्रभातनगर परिसर, पेठरोड, जकातनाका, वेदनगरी, उज्ज्वलनगर इ,. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, इंद्रप्रस्थ सोसायटी, पेठरोड, जकातनाका परिसर, नमन हॉटेल परिसर, संत सावतानगर, डीटीपीनगर इत्यादी परिसरात शनिवारी सकाळचा, दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवारी (१५ ऑगस्ट) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.