नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या काही भागात येत्या बुधवारी आणि गुरुवारी पाणी पुरवठा केला जाणार नाही. तशी माहिती नाशिक महानगरपालिकेने दिली आहे. सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासून सुरु होणारी आणि सातपुर, सिडको, नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी 1200 मी.मी. व्यासाची सिमेंटची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला सातमाऊली चौक, महिंद्रा कंपनी कंपाऊंड लगत आणि त्र्यंबक रोड डेमोक्रेसी मंगल कार्यालय येथील चौकात पाणी गळती सुरु आहे. या ठिकाणी दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. यास्तव बुधवार दि. 20 एप्रिल रोजी सदरील पाईपलाईन गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सातपुर प्रभाग, भागश: नवीन नाशिक प्रभाग व भागश: नाशिक पश्चिम विभागातील प्रभागात बुधवारी दि. 20 एप्रिल रोजी पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार दि. 21 एप्रिल रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.
या भागात पाणी पुरवठा नाही
1) सातपूर विभागातील सर्व प्रभाग व संपुर्ण परिसर
प्र.क्र. 8, 9, 10, 11, 26 व प्र.क्र. 27 भागश: मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौक
2) नाशिक पश्चिम विभागातील खालील भाग
प्र.क्र. 7 मधील नहुष सोसायटी परिसर, पुर्णवाद नगर, दादोजी कोंडदेव नगर, अरिहंत नरसिंग होम परिसर, आकाशवाणी टॉवर परिसर, तिरुपती हाऊस परिसर, सहदेव नगर, सुयोजित गार्डन परिसर, आयचित नगर,गीतांजली सोसायटी, पंपीग स्टेशन, शांती निकेतन इत्यादी परिसरात प्र.क्र. 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर कामगार नगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटे नगर, पत्रकार कॉलनी, पी.टी.सी. संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गडकरीची चौक व गायकवाड नगर परिसर इत्यादी.
3) नविन नाशिक विभागातील खालील भाग
प्र.क्र. 25 (भागश परिसर) इंद्रनगरी परिसर, कामठवाडा, धन्वतरी हॉस्पिटल कॉलेज परिसर, महालक्ष्मी नगर, दत्त नगर, मटाले नगर,
प्र.क्र. 26 (भागश: परिसर) शिवशक्ती नगर, आयटीआय पुलाजवळी परिसर बॉम्बे टेलर परिसर
प्र.क्र 27 (भागश: परिसर) चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबा नगर, अंबड मळे परिसर
प्र.क्र. 28 (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर,