नाशिक (इंडिया दरिपण वृत्तसेवा) – नाशिक शहराच्या काही भागात आज पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवटा विभागाने दिली आहे. गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र येथून नाशिकरोड विभागाला रॉ वॉटर पुरवठा करणारी 800 मी.मी. पी.एस.सी. पाईपलाईन आहे. या पाईपलाईनला उपनगर नाका मोठ्या प्रमाणावर गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. परंतु कामाचे स्वरुप मोठे असल्याने कामास विलंब लागणार आहे. तसेच गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र आवारातील यांत्रिकी विभागातील अखत्यारीतील रॉ वॉटर आऊटलेट व्हॉल खराब झाला आहे. त्यामुळे या कामास एक दिवस अधिक लागणार आहे. त्यामुळे नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. 16 पुर्ण, प्र.क्र. 23 व 30 भागश: अशोका मार्ग, शिवाजी नगर, डि.जी.पी. नगर, आंबेडकर नगर बोधले नगर, टाकळी गांव, टाकळी गांव परिसर, रामदास स्वामी नगर, उत्तरा नगर, रवि शंकर मार्ग, पखाल रोड, ममता नगर, वडाळा गांव, विनय नगर, जयदिप नगर, रेहणुमा नगर, रॉयल कॉलनी, गणेश बाबा नगर, साईनाथ नगर, गुलशन कॉलनी, हॅपी होम कॉलनी, आनंद नगर, इ. परिसर व संपुर्ण नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. 17,18,19,20, 21 व 22 मधील पाणीपुरवठा शनिवार (२९ जानेवारी) सकाळ सत्राचा पाणी पुरवठा होणार नाही. दुपार सत्र व सांयकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, असे महापालिकेने कळविले आहे.