नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्पतरु नगर जलकुंभावरील ५०० मिमी रायझिंग मेनचा व्हॉल नादुरुस्त झाला आहे. हा व्हॉल बदलला जाणार आहे. त्यामुळे नाशिक पुर्व भागातील प्र. क्र. 23 मधील रॉयल कॉलनी, राजा कॉलनी, रेहनूमा नगर, जय हिंद कॉलनी, ममतानगर, कल्पतरू नगर, मातोश्री कॉलनी, आदित्य नगर, गणेश बाबा नगर व अशोका मार्ग इत्यादी परिसरातील पाणी पुरवठा बाधित होणार आहे. येत्या मंगळवारी (५ जुलै) सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही तर, बुधवारी (६ जुलै) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे.
Nashik Water Supply Information by Municipal Corporation