नाशिक – शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे. खासकरुन धरणक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने गोदावरीसह अनेक धरणांमधून सध्या विसर्ग वाढविण्यात येत आहे. गोदाकाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील खालील ठिकाणी सुरू असलेला विसर्ग आणि त्याची आकडेवारी अशी
धरण व विसर्ग – सकाळी ६ ते १० पर्यंत
(आकडेवारी क्युसेक्स मध्ये)
गंगापूर – १० हजार ५३१
कश्यपी – २ हजार १५०
गौतमी गोदावरी – १ हजार १५०
होळकर पूल – १३ हजार ४
नांदूरमध्यमेश्वर बंधारा – २४ हजार ७१३
पर्जन्यमान (सकाळी ६ ते १० पर्यंत मिमी मध्ये)
गंगापूर – ४
कश्यपी – ७
गौतमी – ८
त्र्यंबकेश्वर – ४
अंबोली – ८