अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (एमसीए सिनियर इन्विटेशन लीग) दोन दिवसीय कसोटी सामन्यात तन्मय शिरोडेने भेदक गोलंदाजी केली. नाशिक विरुद्ध अहमदनगर हा सामना अनिर्णित ठरला असला तरी नाशिकने नगर संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट संघातर्फे धनंजय ठाकुर, सिद्धार्थ नक्का यांनी पहिल्या तर यासर शेख व कुणाल कोठावदे यांनी दुसर्या डावात अर्धशतके झळकवली. डावखुरा फिरकी गोलंदाज तन्मय शिरोडेने ६ तर ऑफ स्पिनर तेजस पवारने ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक व निकाल असा:
नाशिक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी – पहिला डाव – सर्वबाद २६८ (७२ षटके)
धनंजय ठाकुर ६४, सिद्धार्थ नक्का नाबाद ६३. मंगेश कदम , संदिप अडोळे व अशकान काझी प्रत्येकी २ बळी.
अहमदनगर
पहिला डाव – सर्वबाद १९८ (४९.१ षटके) – सौरव मोरे ५६, श्रीपाद निंबाळकर ४७ . तन्मय शिरोडे ६ तर तेजस पवार ३ व सिद्धार्थ नक्का १ बळी.
नाशिक दुसरा डाव – ३ बाद १६२ (३८ षटके) – यासर शेख ५८, कुणाल कोठावदे नाबाद ५४.