नाशकात एकाच घरात ८०० मतदार? खरं काय आहे?
निवडणूक अधिकारी म्हणतात…
124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात
‘एकाच घरात 800 पेक्षा अधिक मतदार’ या प्रसिद्ध वृत्तचा खुलासा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – 124- नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये 3829 या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असल्याबाबतची बातमी 15 व 16 ऑक्टोबर रोजी विविध वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार जुने नाशिक शहरातील संबंधित घर क्रमांक 3829 वर नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद नसून केवळ 3 मतदार असल्याची नोंद मतदार यादीत नमूद असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या खुलाशानुसार याच मतदार संघातील घर क्रमांक 3892 असा पत्त्यामध्ये उल्लेख असलेल्या 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असून त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आणि मतदार नोंदणी अधिकारी 124- नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ यांना याबाबतची पडताळणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आले असता त्यांच्याकडून खालील प्रमाणे प्राथमिक अहवाल प्राप्त झालेला आहे.
▪️ 124- नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील जुने नाशिक या परिसरातील घर क्रमांक 3892 हा सीटी सर्वे क्रमांक 4905/5 मधील असून त्याचे एकूण क्षेत्र सुमारे 1501.00 चौ.मी आहे. या ठिकाणी सुमारे 700 निवासी/ अनिवासी या बांधीव मिळकती असुन प्रत्येक मिळकतीस मिळकत/ इंडेक्स क्रमांक हा वेगळा आहे. म्हणजेच घर क्रमांक 3892 ही एकच सदनिका/ इमारत नसून त्यात सुमारे 700 निवासी/ अनिवासी या बांधीव मिळकतींचा समावेश आहे. त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असल्याचे दिसून येते
▪️ घर क्रमांक 3892 ही एकच सदनिका/ इमारत नसल्याचे तसेच तेथील मिळकत अनेक व्यक्तींच्या म्हणजेच एकूण साधारण 700 व्यक्तींच्या नावावर दिसून येत असल्याने एकाच घरात 800 पेक्षा जास्त मतदार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे दिसून येते.
असा खुलासा उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सरदेसाई यांनी केला आहे.
124-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात
‘एकाच घरात 800 पेक्षा अधिक मतदार’ या प्रसिद्ध वृत्तचा खुलासा
नाशिक, दि. 16 ऑक्टोबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): 124- नाशिक मध्य विधानसभा मतदार संघामध्ये 3829 या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद असल्याबाबतची बातमी 15 व 16 ऑक्टोबर रोजी विविध वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार जुने नाशिक शहरातील संबंधित घर क्रमांक 3829 वर नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी केली असता या घर क्रमांकावर 800 पेक्षा अधिक मतदारांची नोंद नसून केवळ 3 मतदार असल्याची नोंद मतदार यादीत नमूद असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.