नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव पिंपरी रस्त्यावरील विंचुरी गवळी येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी तब्बल १५० पेक्षा जास्त बैलगाडा मालक राज्यभरातून या शर्यतीत सहभागी झाले तर तब्बल १०३ शर्यती पार पडल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गाडामालकांना आर्थिक स्वरूपाचे बक्षिसे प्रदान करण्यात आली तर मुख्य शर्यतीला ७ हजार रु.रोख,स्मृतिचिन्ह व मानाचा नारळ देत सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगतातून आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले कि, नाशिक तालुक्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्यास्पर्धा होत आहे. या शर्यती आयोजनामागे नाशिकच्या शेतकरी बांधवांना आनंद देण्याच्या उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगतांना नागरिकांच्या उपस्थितीने त्यामागील उद्देश्य देखील सध्या झाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय आमदार निलेश लंके म्हणाले की, खऱ्या अर्थाने झाशीची राणी व सावित्रीमाईची लेक म्हणून आमदार आहिरे या कार्यरत असून देवळाली मतदार संघाच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी मिळविणाऱ्या आमदार म्हणून सरोज आहिरे यांच्याकडे विधानसभेत पाहिले जाते. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी व प्रभावी भाषाशैलीने त्यांनी सर्वाचेच मन जिंकले असे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी खासदार देविदास पिंगळे,तालुका अध्यक्ष राजाराम धनवटे, विद्यार्थी अध्यक्ष सोमनाथ बोराडे, तुषार खांडबहाले, माजी जि.प.सदस्य यशवंत ढिकले, भाऊसाहेब ढिकले, गणेश गायधनी, संदेश टिळे, शीतल भोर, सरपंच मधुकर ढिकले,सरपंच अनिता रिकामे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब म्हस्के तर आभार रमेश कहांडळ यांनी मानले.