गौतम संचेती, नाशिक
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत निश्चित झाली असून त्यात बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारी पुन्हा मिळाली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे कोण उमेदवार समोर असेल याची उत्सुकता होती. ती आता संपुष्ठात आली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. तर भाजपने पाच जागा जिंकल्या. तर शिवसेनाला २ व काँग्रेस व एमएमआयला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही आमदार शिंदे गटात तर राष्ट्रवादीचे ६ आमदार हे अजित पवार गटात गेले. तर काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर हे नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले व त्यांना उमेदवारी मिळाली आहे.
या निवडणुकीत महायुतीने विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाला देण्याचे निश्चित केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ जागांपाकी सर्वाधिक ७ जागा अजित पवार गटाला मिळाल्या आहे. तर त्या खालोखाल भाजपला ५ जागा मिळाल्या आहे. शिंदे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. मालेगावची जागा कोणाला जाते हे अद्याप निश्चित नाही. पण, ही जागा अजित पवार गटालाच जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे ही संख्या आठ होऊ शकते.
महाविकास आघाडीत ,शिवसेना ठाकरे गटाला ६ ,राष्ट्रवादी शरद पवार गटाला ५, काँग्रेसला ३ व एक जागा माकपला गेली आहे. यातील एक दोन जागा जाहीर होणे बाकी आहे. ठाकरे गटाला नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, देवळाली, मालेगाव, नांदगाव, निफाड या सहा जागा मिळाल्या आहे. तर शरद पवार गटाला येवला, दिंडोरी, सटाणा, सिन्नर, नाशिक पूर्व तर काँग्रेसला चांदवड, इगतपुरी, मालेगाव हे मतदार संघ मिळणार आहे. तर कळवणची जागा माकपला जाणार आहे.
असे असेल विधानसभा उमेदवार
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) – अनिल कदम ( शिवसेना ठाकरे गट)
कळवण – नीतीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) – जे. पी. गावित (माकप)
सिन्नर – माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )- उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – सुनीता चारोस्कर(राष्ट्रवादी शरद पवार गट)
देवळाली – सरोज आहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) – योगशे घोलप (शिवसेना ठाकरे गट)- मोहिनी गोकुळ जाधव (मनसे)
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) – लकीभाऊ जाधव (काँग्रेस)
मालेगाव – दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) – अव्दैय हिरे ( शिवसेना ठाकरे गट)
नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) – गणेश धात्रक (शिवसेना ठाकरे गट), समीर भुजबळ (अपक्ष)
नाशिक पूर्व – अॅड राहुल ढिकले ( भाजप) – गणेश गिते (राष्ट्रवादी शरद पवार गट) – प्रसाद दत्तात्रय सानप (मनसे)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप) – वसंत गिते (ठाकरे गट) – अंकुश अरुण पवार (मनसे)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) – सुधाकर बडगुजर (शिवसेना ठाकरे गट) – दिनकर पाटील (मनसे)
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप) – दीपीका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट)
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) – शिरीष कोतवाल (काँग्रेस), केदा नाना आहेर (अपक्ष)
मालेगाव – एजाज बेग (काँग्रेस ) मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (एमआयएम) – आसिफ शेख (अपक्ष) –