नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदार संघातून ३३७ उमेदवारांपैकी १३७ उमेदवारांनी माघार घेतली. आता या मतदार संघात २०० उमेदार रिंगणात आहे. सर्वाधिक जास्त उमेदवार हे मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात आहे. त्यांची संख्या २१ आहे. तर सर्वात कमी उमेदवार हे कळवण विधानसभा मतदार संघात असून त्याची संख्या ७ आहे.
नाशिक मध्य मधून हेमलता पाटील, रंजन ठाकरे, अंकुश पवार, गुलजार कोकणी यांनी माघार घेतली. तर देवळाली शिवेसना गटाचे राजश्री अहिरराव यांची माघार घेतली असली तरी येथे तांत्रिक मुद्दा उपस्थितीत झाला आहे. पश्चिममधून माकपचे डॉ डी एल कराड, भाजपचे शशिकांत जाधव यांनी माघार घेतली आहे.
नामनिर्देशपत्र माघारीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्याचे वृत्त आहे. याबाबतची अधिकृत माहिती आता थोड्यावेळाने प्रसिध्द केली जाणार आहे. माघारी झाल्यानंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.