नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघातून ३३७ उमेदवारांनी ४४६ नामनिर्देशनपत्र वैध ठरवण्यात आले आहे. नाममिर्देशन पत्र छाननीत आज २५ उमेदवारांचे ६० अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. आता ४ नोव्हेंबर रोजी माघारीच्या दिवशी यातील एकुण रिंगणात असलेली उमेदवारांची संख्या समोर येणार आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीने सर्वच मतदार संघात उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तर मनसेने सहा उमेदवार दिले आहे. इतर राजकीय पक्षांची संख्या कमी आहे. पण, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणा-यांची संख्या जास्त आहे.
इतक्या उमेदवारांचे अर्ज वैध
नांदगाव – ३२
मालेगाव मध्य -१६
मालेगाव बाह्य – ३२
बागलाण – २६
कळवण – १५
चांदवड – २२
येवला – ३०
सिन्नर – २२
निफाड – १७
दिंडोरी – २१
नाशिक पूर्व-१५
नाशिक मध्य-२१
नाशिक पश्चिम – २२
देवळाली – १८
इगतपुरी – २८