गौतम संचेती, नाशिक
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत निश्चित असून त्यात बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारी पुन्हा मिळणार असल्यामुळे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे कोण उमेदवार समोर असेल याची उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. तर भाजपने पाच जागा जिंकल्या. तर शिवसेनाला २ व काँग्रेस व एमएमआयला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही आमदार शिंदे गटात तर राष्ट्रवादीचे ६ आमदार हे अजित पवार गटात गेले. तर काँग्रेसचे एकमेव आमदार असलेले हिरामण खोसकर हे नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले आहे.
या निवडणुकीत महायुतीने विद्यमान आमदार असलेल्या जागा त्याच पक्षाला देण्याचे निश्चित केल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ जागांपाकी सर्वाधिक ७ जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. तर त्या खालोखाल भाजपला ५ जागा मिळणार आहे. शिंदे गटाला अवघ्या दोन जागा मिळणार आहे. मालेगावची जागा कोणाला जाते हे अद्याप निश्चित नाही. पण, ही जागा अजित पवार गटालाच जाण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे ही संख्या आठ होऊ शकते.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटात जास्त जागा जातील. पण, त्याचे सूत्र अद्याप समोर आलेले नाही. शरद पवार गटाला विद्यमान आमदार असलेले सहा मतदार संघ मिळतील. पण, काही मतदार संघात बदल होऊ शकतो. निफाड, येवला, कळवण व सिन्नर येथे हा बदल होऊ शकतो. कळवणची जागा माकपाला दिली जाणार हे जवळपास निश्चित आहे.
असे असेल विधानसभा उमेदवार
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – कुणाल दराडे (शिवसेना ठाकरे गट) , अमृता पवार, संभाजी पवार
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) – अनिल कदम ( शिवसेना ठाकरे गट)
कळवण – नीतीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) – जे. पी. गावित (माकप)
सिन्नर – माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )- उद्यय सांगळे (महाविकास आघाडी)
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) – सुनीता चारोस्कर, गोकुळ झिरवाळ (शरद पवार गट)
देवळाली – सरोज आहिरे – प्रितम आढाव, डॅा. राजश्री अहिरराव, लक्ष्मण मंडाले (महाविकास आघाडी)
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) – निर्मला गावित (शिवसेना ठाकरे गट)
मालेगाव – दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) – अव्दैय हिरे ( शिवसेना ठाकरे गट)
नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) – गणेश धात्रक (शिवसेना ठाकरे गट), महेंद्र बोरसे (शरद पवार गट)
नाशिक पूर्व – अॅड राहुल ढिकले ( भाजप) – जगदिश गोडसे, अतुल मते (महाविकास आघाडी)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे (भाजप) – वसंत गिते, नितीन ठाकरे (महाविकास आघाडी)
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) – सुधाकर बडगुजर (शिवसेना ठाकरे गट)
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप) – दीपीका चव्हाण (शरद पवार गट)
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) – शिरीष कोतवाल (काँग्रेस)
मालेगाव – मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल (एमआयएम) – आसिफ शेख (अपक्ष)