बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक विभागातील पोलीसांविरुद्धच्या तक्रारींची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण करणार या तारखेला सुनावणी…

फेब्रुवारी 6, 2025 | 8:36 pm
in संमिश्र वार्ता
0
Maharashtra Police

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सर्वसामान्य नागरिकांच्या पोलिसांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीची दखल घेण्यासाठी राज्य व विभागीय स्तरावर पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांना सोयीचे होईल आणि त्यांचा वेळ व पैसे वाचतील या हेतूने, राज्य पोलीस प्राधिकरणाने विभागीय पातळीवर सुनावणी घेण्याचे ठरविले असून नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक येथे दिनांक १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणातील, नाशिक विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेण्यात येणार आहे.

या सुनावणीसाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणचे अध्यक्ष तथा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे, सदस्य उमाकांत मिटकर व विजय सदबीर सिंग हे उपस्थित राहणार आहेत. या सुनावणींमध्ये पोलीस कोठडीतील मृत्यू, बलात्कार अथवा बलात्काराचा प्रयत्न, पोलिसांनी विहित कार्यपद्धती शिवाय केलेली अटक किंवा डांबून ठेवणे, भ्रष्टाचार, खंडणी उकळणे, दिवाणी स्वरूपांच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप, जमीन अथवा घर बळकावणे किंवा त्यास मदत करणे आणि कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन आणि दुरुपयोग करणे याबाबतीत नागरिक या प्राधिकरणाकडे तक्रारी करू शकतात. पोलिसांच्या विरुद्ध अशा स्वरूपाच्या तक्रारी असल्यास राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण अथवा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण येथे दाखल करता येतील असे राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे सहायक पोलीस आयुक्त / पोलीस उपअधिक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची प्रकरणांची सुनावणी घेण्यात येते तर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणात पोलीस निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्धच्या तक्रारींची सुनावणी घेण्यात येते. प्राधिकरणाकडे आलेल्या तक्रारींची छाननी करून प्राथमिक सुनावणी घेऊन येथे न्यायालयांप्रमाणे, पोलिसांविरुद्धची तक्रारीची प्रकरणे दाखल केली जाऊ शकतात. त्याची न्यायालयांप्रमाणे सुनावणी घेतली जाते. सुनावणी दरम्यान नागरिक व पोलीस यांना त्यांचे लेखी म्हणणे सादर करून तोंडी युक्तिवाद करावा लागतो. सुनावणी नंतर जर पोलीस अधिकारी कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासाठी शासनास अहवाल पाठविला जातो.

भारतात कार्यरत असलेल्या सर्व पोलीस दलात आमुलाग्र सुधारणा करणे आवश्यक असल्याचे व नागरिकांना पोलिसांच्या विरुद्ध तक्रारी करण्यासाठी एक स्वतंत्र व्यासपीठ अथवा यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे नॅशनल पोलीस कमिशनने आपल्या अहवालात नमूद केले होते, त्याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने दिनांक २२ सप्टेंबर २००६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्यात, लोकांच्या, पोलिसांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी एक व्यासपीठ असावे असे निर्देश दिले होते. त्यास अनुसरून महाराष्ट्रात सन २०१४ मध्ये ‘महाराष्ट्र पोलीस अॅक्ट’ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार सन २०१७ पासून, राज्यस्तरावर ‘राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण’ याची तर विभागीय स्तरावर ‘विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण’ याची स्थापना करण्यात आली. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या पोलिसांच्या विरुद्ध असलेल्या तक्रारीची दखल घेतली जाते. त्यामध्ये ‘कलम २२ क्यू’ प्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियमांमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश हे अध्यक्ष असतात तर सेवानिवृत्त स्पेशल आयजीपी, सेवानिवृत्त सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी, सर्वसामान्यांमधील प्रतिष्ठित व्यक्ती हे सदस्य असतात, तर अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम बघतात.

नागरिकांच्या माहितीसाठी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण व विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे यांचे पत्ते व संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार प्राधिकरण, प्राधिकरणाचा पत्ता, अंतर्भूत जिल्हे आणि संबंधित प्राधिकरणाचे अध्यक्ष/सदस्य यांची माहिती अनुक्रमे खालीलप्रमाणे आहे,
लागते.

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई ( प्राधिकरणाचा पत्ता: कुपरेज टेलिफोन एक्चेंज, ४ था मजला, महर्षी कर्वे रोड, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ दूरध्वनी: ०२२- २२८२००८९/४५), अंतर्भूत जिल्हे: राज्यातील सर्व जिल्हे अंतर्भूत.
अध्यक्ष: माजी न्यायमुर्ती श्रीहरी डावरे, सदस्य – उमाकांत मिटकर (समाजातील मान्यवर व्यक्ती), डॉ. विजय सतबीर सिंग (भाप्रसे) (से.नि).

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, कोकण. (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, पहिला माळा, प्लॉट नं ०७ (ब), से.नं २१, खारघर, नवी मुंबई ४१०२१० श्री. सूर्यवंशी ८६५२६२८७८६). अंतर्भूत जिल्हे: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग.
अध्यक्ष: श्री. बावस्कर, सदस्य: सुधीर दाभाडे, महेश भिंगाडे.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नाशिक (अजय पॅलेस, १ ला मजला, काठेगल्ली, पौर्णिमा बस स्टॉप जवळ, द्वारका, नाशिक ४२२००१. दूरध्वनी: ०२५३-२५९४०१५/१६). अंतर्भूत जिल्हे: नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगांव, नंदुरबार
अध्यक्ष: श्री. भटकर, सदस्य: सुनील कडासने, अमित डमाले,

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे (अनंत हाईट्स, १ ला मजला, जाधव नगर, नांदेड सिटीच्या पुढे, सर्वे. नं. २९/२/१, सिंहगड रोड, पुणे-४११०६८. दूरध्वनी: ०२०-२४३८००७४/७५/७९). अंतर्भूत जिल्हे: पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर.
अध्यक्ष: श्रीमती सावंत, सदस्य : श्री.साळुंखे, श्री. विजय पाटील.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर (आरटीओ ऑफीस, पदमपुराच्या बाजूला, महापौर निवास स्थानक समोर, बन्सीलाल नगर, छत्रपती संभाजीनगर. श्रीमती पाटोळे ७६२०३१९६९३). अंतर्भूत जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशीव, लातूर.
अध्यक्ष: मिलींद बिलोलीकर (अतिरिक्त कार्यभार), सदस्य: एम.के. भोसले, मिलींद बिलोलीकर.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अमरावती (पोलीस आयुक्त कार्यालय परिसर, राणा अमरावती, अकोला, नगर, अमरावती-४४४६०६ दूरध्वनी: ०७२१-२५५ २८५५), अंतर्भूत जिल्हे: अमरावती, अकोला. वाशिम, बुलढाणा, यवतमाळ.
अध्यक्ष: श्रीमती उषा ठाकरे, सदस्य: पुंडलीक पाटील, पंकज निखार.

विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, नागपूर (प्रशासकिय इमारत क्र २. बी विंग, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स, नागपूर ४४०००१. दूरध्वनी :०७१२- २५६ ६६७३). अंतर्भूत जिल्हे: नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुर.
अध्यक्ष:सुरेंद्र शर्मा, सदस्य: दिलीप झळके, अरविंद दुबे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाच हजाराची लाच घेतांना भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Next Post

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चांना आळा घालावा, जाणून घ्या, शुक्रवार, ७ फेब्रुवारीचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अनावश्यक खर्चांना आळा घालावा, जाणून घ्या, शुक्रवार, ७ फेब्रुवारीचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011