नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील नाशिक महसूल विभागातील पाच जिल्हयापैकी धुळे जिल्हा कोरोनामुक्त झाला असून नंदुरबार जिल्ह्यात केवळ एकाच रुग्णांवर उपचार सुरु आहे. या विभागात नाशिक, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना मुक्त जिल्हा होण्यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात १ हजार ५२, जळगाव जिल्हयात २६ तर अहमनगर जिल्हयात ५ हजार ३८३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहे.
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत ४५ हजार ८४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५ हजार १२३ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच धुळे जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचार सुरु घेत नसून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४२ टक्के इतके आहे. आजपर्यंत ६६८ रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.४५ टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार ३४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ हजार ३८९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के इतके आहे. आजपर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.३५ टक्के आहे.