नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र ओबीसी सुवर्णकार समितीच्यावतीने येत्या रविवारी (११ सप्टेंबर) राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आडगाव नाक्या जवळील राजीव मंगल कार्यालय येथे हा मेळावा होणार आहे. सोनार समाजातील सर्व शाखीय या वधू-वर मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे. संपूर्ण सोनार समाज एकत्र आला पाहिजे. सुवर्णकार समाजामध्ये एकूण १८ पगड जाती आहेत. यामध्ये रोटी-बेटी व्यवहार झाले पाहिजे. या उद्दात हेतूने हा वधू-वर मेळावा घेण्यात येत आहे. समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी वधू-वरांना त्यांचा प्रवास खर्च समितीच्यावतीने दिला जाणार असल्याचेही घोडके यांनी सांगितले आहे.
Nashik Vadhu Var Melava Travelling Expenses
Obc Suvarnakar Samiti