नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर पोलिस दलातील आणि उपनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला लाचखोर सहायक पोलिस निरीक्षक सागर गंगाराम डगळे (वय ३८ वर्षे) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. लाचखोर डगळेने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तो रंगेहाथ सापडला आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी पुण्याला जाणे आवश्यक होते. भावाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपास कामी पुणे येथे जाण्यासाठी लागणाऱ्या खाजगी वाहनाचा आणि जेवणाच्या खर्चासाठी लाचखोर डगळे याने १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. आणि या सापळ्यात लाचखोर डगळे हा ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी
अनिल बागुल,(पोलीस निरीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 9922228004
सापळा पथक*-
पो. ना. किरण अहिरराव,
पो. ना.अजय गरुड
पो.ना. चंद्रशेखर मोरे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मार्गदर्शक
.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मो.न. 9371957391
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक. मो.न. 9823291148
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक. मो.न. 9822627288.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230, 02532575628
*टोल फ्री क्रमांक १०६४
Nashik Upnagar API Police Acb Raid Trap Bribe Corruption