नाशिक – शहर परिसरात आज सायंकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. सायंकाळी आकाशात मेघांनी गर्दी केली होती. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याने नाशिककरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होती. मात्र, पाऊस आल्याने दिवाळीच्या या सर्व खेरदीवर पाणी फेरले गेले. अनेक जण दुचाकीवरुनच आपल्या घरी किंवा गावाकडे निघाले होते. यांनाही पावसाने गाठल्याने त्यांचीही चांगलीच पंचाईत झाली. राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. मात्र, त्यात नाशिकचा समावेश नव्हता. आता पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या अर्धा तासापासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1456613422288670720