विशेष प्रतिनिधी, नाशिक
आज सायंकाळच्या सुमारास आडगाव परिसराला तुफान गारपीटीने झोडपले आहे. दुपारच्या सुमारासच वातावरण बदलल्याने पाऊस पडेल, अशी शक्यता होती. मात्र, सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आडगाव परिसराला गारपीटीने झोडपले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. या परिसरात शेती मोठ्या प्रमाणात आहे. काढणीला आलेला कांदा, भाजीपाला आणि शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तुफान गारपीटीचे बघा हे फोटो आणि व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=2989726947965499