नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर ईपीएफ पेंशनर्स धारकांनी थाळीनाद आंदोलन केले. ९ हे हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह देण्याच्या मागणीसाठी ईपीएफ पेन्शन धारकांनी गंगापूर रोडवरील शहीद सर्कल जवळ थाळीनाद आंदोलन केले.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घराकडे निघालेल्या या ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी रस्त्यातच अडवले. त्यानंतर या आंदोलक जेष्ठ नागरिकांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. नऊ वर्षांपासून केंद्र सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. नाशिकचे दोन्ही खासदार लोकसभेत पेन्शन धारकांचा विषय मांडत नसल्याचा देखील आरोप करण्यात आला. जर आमची मागणी मान्य झाली नाही, तर २०२४ मध्ये या सरकारला त्यांची जागा दाखवून पुन्हा सत्तेवर येऊ न देण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आयटकचे सचिव राजू देसले ईपीएफ पेंशनर्सचे जिल्हाध्यक्ष समीर सूर्यवंशी यांनी आंदोलनाची माहिती दिली.
Nashik Union Minister Bharti Pawar Home Protest