इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरातील विविध प्रश्नांवर मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्यावरु ठाकरे गटाचे नेते जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात वाद झाला. यानंतर पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. या बैठकीतच्या राड्याची नाशिकमध्ये आता जोरदार चर्चा आहे.
ही बैठक शालीमार येथील शिवसेना ठाकरे कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाशिक शहरातील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा तसेच शेतक-यांचे प्रश्न यावर विशेष चर्चा होती. पण, याच बैठकीत दिंडे यांनी नाशिक मध्यमधून वसंत गीते यांचा पराभव झाला यावर भाष्य केले. या निवडणुकीत एमडी ड्रग्जसह इतर मुद्दे आपण नीट हाताळले नाही असे सांगितले.
त्यानंतर प्रचाराची धुरा सांभाळणारे विनायक पांडे उभे राहिले. त्यांनी जर ४० वर्षांमध्ये आम्ही लढा देत होतो, तर आम्ही ४० वर्ष नेमकं केल काय असा सवाल उपस्थिती केला. त्यानंतर हा वाद वाढला. त्यानंतर दिंडे यांनी या वादावर पडदा टाकत माफी मागितली. पण, विनायक पांडे कार्यालयातून संतापून बाहेर पडले.
नाशिकमध्ये मनसे व ठाकरे गटाचे नेते नाशिकच्या प्रश्नांवर एकत्र आलेले असतांना ठाकरे गटाच्या या दोन नेत्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे या बैठकीला गालबोट लागले.