मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील प्रवेशाचा मुद्दा आज विधिमंडळात चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या आत जाण्याचा प्रयत्न जमावाने केला होता. त्यानंतर हे प्रकरण बरेच तापले. याप्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. पथकाने त्र्यंबकला येऊन विश्वस्तांसह पोलिस आणि अन्य जणांचे जबाब नोंदवले. हा प्रश्न आज विधिमंडळात उपस्थित करण्यात आला.
त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्र्यंबकेश्वरमध्ये मुस्लिम समुदायातर्फे धूप दाखविण्याची पद्धत जुनी आहे का, हाच मुळात वाद आहे. अशी प्रथा नसल्याचे ट्रस्टी सांगतात. विश्वस्तांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. SIT मार्फत तपास सुरू आहे. एक महिन्यात त्याचा अहवाल येईल. श्रद्धा आणि परंपरा कुठल्या पाळाव्या, यात शासनाचा हस्तक्षेप नाही, पण त्या नावाखाली हुडदंग सहन करणार नाही.
फडणवीस यांनी सभागृहाला नेमके काय सांगितले बघा त्याचा हा व्हिडिओ