नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे 20 ऑगस्ट ते 12 सप्टेबर 2023 या कालावधीत श्रावण सोमवार निमित्त यात्रेसाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी व प्रदक्षिणेसाठी येतात. यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागामार्फत करण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) शहाजी उमाप यांनी केले आहे.
*यात्रा काळात भाविकांनी खालील सुचनांचे करावे पालन*
भाविकांनी आपल्या सोबत कमीत कमी सामान आणावे
यात्रेकरूने आपल्या सोबत मौल्यवान चीज वस्तू आणु नये.
मंदिरात भाविकांना बॅगस् व पिशव्या इत्यादी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
यात्रेत कोणतीही बेवारस अगर संशयित वस्तु आढळून आल्यास स्पर्श न करता त्वरीत पोलीसांच्या निदर्शनास आणावे.
कोणतीही संशयास्पद व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असल्यास याबाबत पोलीसांच्या निदर्शनास आणावी.
भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत
यात्रेत कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोणी जाणुन-बुजुन अफवा पसरवत असल्यास तसे पोलीसांना तात्काळ कळविण्यात यावे.
वरील सर्व सुचनांचे नागरिकांनी पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) शहाजी उमाप यांनी केले आहे.
Nashik Trimbakeshwar Shravan Devotees SP Police
Rural District Shahaji Umap