त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अधिक श्रावण महिन्याचा उत्तरार्ध व रविवारची सार्वजनिक सुटी साधत भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासुनच भोलेनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्यानेही भाविकांची संख्या वाढली आहे.
दोनशे रुपये देणगी दर्शनाची रांग थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत गेली होती. देणगी दर्शनासाठी दोन तासांपेक्षा अधिक कालावधी लागत होता. तर धर्मदर्शन मंडपातील सर्व रांगा फुल होऊन दर्शन रांग थेट ऊदासीन आखाड्यापर्यंत पोहोचली होती. धर्मदर्शन रांगेतुन दर्शनासाठी पाच तासांपेक्षा जास्त कालावधी लागत होता. नगरपरिषदेचे वाहनतळ बांधुन तयार आहे मात्र उद्घाटना अभावी बंद असल्याने भाविकांनी आपली वाहने जेथे जागा मिळेल तेथे लावली होती. त्यामुळे भाविकांच्या वाहनांचा वेढा शहराला पडला होता. यामुळे ठिकठिकाणी रहदारीची कोंडी होत होती. रस्त्याने पायी चालणेही अवघड होऊन बसले होते. भगवान त्र्यंबकराजाला रुद्राभिषेक पुजा करण्यासाठीही मंदिराच्या सभामंडपात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पो.नि. बिपिन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Nashik Trimbakeshwar Devotee Crowd Holiday
que adhik mas sunday