नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासी पाड्यावरील क्रिकेटची आवड असणाऱ्या विद्यार्थिनींना इंडियन प्रीमियर लीगचा प्रत्यक्ष सामना बघण्याची संधी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध झाली. या भागात राहणाऱ्या जवळपास १५० हून अधिक मुलींना आयपीएलचा सामना प्रत्यक्ष पाहता आल्याने त्या हरखून गेल्या.
सध्या सुरू असलेले आयपीएलचा सामना स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थिनींना पाहता आला. त्यासाठी या मुली मुंबईकडे रवाना झाल्या. आयपीएल म्हटलं की क्रिकेटविश्वातील सर्वात मोठा खेळाचा उत्सव मानला जातो. क्रिकेटप्रेमी वर्षभरापासून या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात. आजकाल तर मुलींचा देखील कल हा क्रिकेटकडे असल्याचे दिसून येत आहे.
मागील काही वर्षात इंडियन वुमन क्रिकेट टीम फॉर्मात असल्याने अनेक मुलींची क्रिकेट ही आवड बनली आहे. मात्र ते आकर्षक टीव्ही पुरत मर्यादित राहते, या ग्रामीण भागातील मुलींना व त्यांच्या पालकांना एवढ्या झगमगाटीच्या शहरात जाऊन प्रत्यक्ष स्टेडियममध्ये सामना पाहणं झेपणार नसतं, त्यामुळे काही स्वयंसेवी संस्था पुढे येऊन इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील दीडशेहून अधिक विद्यार्थींनीना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे आज होणार क्रिकेट सामना बघायला गेल्या.
Nashik Trible Girl Student IPL Match Mumbai